नांदेड जिल्हा प्रतिनिधि / मिलींद बच्छाव : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सामाजिक न्याय विभागातील विविध मागण्यांसाठी समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे विद्यार्थी आक्रोश आंदोलन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील सन 2021-22 व 22-23 या शैक्षणिक वर्षाची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सन 2021-22 व 22-23 या शैक्षणिक वर्षाची रक्कम जमा करावी, शिष्यवृत्ती जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची टीसी तसेच इतर कागदपत्रे देण्यास नकार देणाऱ्या महाविद्यालयांवर कार्यवाही करण्यात यावी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्यात यावी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये व इतर शाखेतील विद्यार्थ्यांना २ हजार रुपये ठोक स्वरूपात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी देण्यात यावे, स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांची समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून होणारी गृह तपासणी तात्काळ थांबवण्याची मागणी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धीरज हाके, जिल्हा महासचिव वैभव लष्करे, जिल्हा, उपाध्यक्ष, दिपक गजभारे घुंगराळेकर सचिव, बालाजी गायकवाड, महानगर महासचिव शुध्दोधन कापसीकर, अभय सोनकांबळे, यशवंत गोणारकर, कश्यप पोवळे, सोनु चौदंते, कबीर थोरात, अरुण पोवळे, यशवंत ढगे, मंगेश धोत्रे, यशस पोवळे, अमित पोवळे, प्रकाश कोलते, प्रा. काळे, अतुल मांजरमकर, अरबाज शेख, सत्यपाल धुताडे,धनंजय गायकवाड, अरविंद गजभारे, उमेश धुताडे, सतीश कांबळे, सुधांशू मुनेश्वर, संतोष वाघमारे, सुबोध धतुरे, विशाल चावरे, विकास गायकवाड, राम पोवळे, सुबोध धतुरे, केतन सोनकांबळे, विनोद बनसोडे, प्रताप गायकवाड, महेश कुडके, स्वप्निल कांबळे, जोंधळे सुबोध, सुरज रायबोले, पतंगे प्रवेश, प्रसेंजीत लोणे, विकास डाकोरे, आशिष गजभारे, अंबादास किनीकर, अक्षय गडेकर, अंकुश गोडबोले, चंद्रकांत, अमरदीप कांबळे, थोरात चंद्रशेखर, विश्वजीत पोवळे, सिद्धार्थ गजभारे, सदाशिव वावळे, अनिकेत गजभारे, आयुष गायकवाड, भूषण पोवळे, सुरज कांबळे आदींची उपस्थिती होती.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या विद्यार्थ्यांचे आक्रोश आंदोलन ; शिष्यवृत्ती स्वाधारच्या घोषणांनी समाजकल्याण दणाणले…

0Share
Leave a reply