अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जनसमर्थ या नावामध्येच संस्कार दडलेला आहे सहकाराबरोबर संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे जनसमर्थ पतसंस्था सहकार क्षेत्रात लवकरच आदर्श उभा करेल असे आवाहन महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले पारनेर तालुक्यातील टाकळीढोकश्वर येथील जनसमर्थ पतसंस्थेचे उद्घाटन समारंभ पद्मश्री पोपटराव पवार व हभप विलास महाराज लोंढे, नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते रविवारी पार पडला.
![]()
यावेळी बाबासाहेब खिलारी, भाऊसाहेब लोंढे, गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा ठ. झावरे, उपसभापती विलास झावरे,जनसमर्थ पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र पायमोडे,व्हा चेअरमन रोहिदास शेरकर, डॉ भाऊसाहेब खिलारी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे जेष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी सर, सरपंच बाळासाहेब खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, संचालक ईश्वरी पायमोडे, जयश्री शेळके संजय औटी सुप्रिया कोकाटे, बापूसाहेब रांधवण, योगेश पायमोडे, जालिंदर बांडे, महेश पाटील, बब्लु रोहोकले, मळिभाऊ रांधवण, संस्थेचे मॅनेजर अशोक ठुबे आदी उपस्थित होते.पोपटराव पवार म्हणाले जनसमर्थ पतसंस्था नक्कीच भविष्य काळात सहाकार क्षेत्रात जन सामान्यांसाठी बळकटी देण्याचे काम करेल, टाकळी ढोकेश्वरसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी निश्चितच अर्थकारण मोठ्या प्रमाणावर होत असते. जनसमर्थ पतसंस्थेच्या माध्यमातून या प्रक्रियेला निश्चितच गती मिळेल. टाकळी ढोकेश्वर सारख्या गावात पैशांची व विचारांची संस्कृती असल्याने ही पतसंस्था अधिक घोडदौड करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनसमर्थ पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळाने अनेक रोजगाराभिमुख युवकांना या पुढील काळात मदत करावी. जनसमर्थ पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत प्रकाश इघे सर यांनी केले तर सर्वांचे आभार रोहिदास शेरकर यांनी मानले
Leave a reply