धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर हे ऐतिहासिक व वैराग्य महामेरू संत गोरोबाकाका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र असल्यामुळे महिन्याच्या एकादशीला येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येतात .
तेर व परिसरात धाबा तेथे अवैद्य देशी व विदेशी बनावटी दारू राजरोसपणे विक्री केली जाते. तसेच अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर जुगार, मटका, ऑनलाइन भिंगरी असे अवैद्य धंदे खुलेआम चालतात हे येत्या 26 जानेवारी पर्यंत बंद करावेत अन्यथा बंद नाही झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून तालुकाध्यक्ष सचिन देवकते हे आत्मदहन करणार आहेत . असे निवेदन राजसपच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव पोलीस अधीक्षक धाराशिव, पोलीस ठाणे ढोकी व तेर ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. निवेदन देताना तानाजी पिंपळे, केशव सलगर, सोमनाथ धायगुडे, विजय वैद्य , रमाकांत लकडे, पवन माने, जगन्नाथ देवकाते, मच्छिंद्र देवकते यांची उपस्थिती होती.