प्रतिनिधी / दत्तू पुरी : महाराष्ट्रात २२ वर्षानंतर पुन्हा चालू झालेल्या मिनी ऑलम्पिक या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांडो या खेळामध्ये ५ खेळाडू २ पंच, १प्रशिक्षक , १ व्यवस्थापक असा अहमदनगर जिल्ह्यातील ९ जणांचा चमु सहभागी होणार आहे. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येत असून राज्यातील खेळाडू, संघटक मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारचा समावेश असून यामध्ये ७५०० खेळाडू, अधिकारी एकाच वेळेस सहभागी होणार आहेत. १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे राज्यात क्रीडामय वातावरण तयार होणार आहे.
या स्पर्धेत तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन अहमदनगर या अधिकृत संघटनेच्या पाच खेळाडूसह व्यवस्थापक, पंच असतील. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे सुरज कोलते, मयुर अडागळे,अनिल तोडकर, शिल्पा पगारे, युवराज लोखंडे आदी पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. योगेश बिचितकर व प्रिया शिंदे पंच ,गणेश वंजारे सर प्रशिक्षक तर नारायण कराळे सर हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतील.
तायक्वांदो स्पर्धा प्रमुख म्हणून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे हे काम पाहणार आहेत
या सर्वांचे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे,महासचिव संदिप ओंबासे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सीईओ गफार पठाण , टेक्निकल डायरेक्टर तुषार आवटे,तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन अहमदनगर चे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपाध्यक्ष श्री संतोष लांडे, सचिव घनश्याम सानप सर, सहसचिव दिनेश गवळी आदींनी या चमूचे अभिनंदन केले आहे.