इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान यावे यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी हॅप्पी मार्केट आणि खाऊ गल्ली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तरी सर्व पालक ,ग्रामस्थ, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाला शोभा आणली. यामध्ये लहान मुलांनी भाजी मंडई तसेच, वेगवेगळे खाऊ गल्ली स्टॉल लावून आलेल्या सर्व पालकांची व ग्रामस्थांची मने जिंकली आलेल्या सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून भाजी मंडई, तसेच वेगवेगळ्या खाऊ गल्ली मध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांकडून खरेदी केली व विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान समजावून सांगितले, अशा प्रकारे शाळेमध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री बापूराव थोरात , मारूतराव थोरात , सचिव विजय भैय्या थोरात , खजिनदार संतोष थोरात , अजय थोरात, सौ संगीता ताई थोरात सौ सुनीताताई थोरात ,हिराबाई बंडगर तसेच प्राचार्य सौ. वंदना थोरात मॅडम तसेच यावेळी मोठ्या प्रमाणावर पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पार पडला.
हॅप्पी मार्केट आणि खाऊ गल्ली “राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित” विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण येथे मोठ्या उत्साहात संपन्

0Share
Leave a reply