धाराशीव प्रतिनिधी/ विजय कानडे : मिनी मंत्रालय असलेल्या तेर ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदी जनतेतून दीदी लोकेश काळे यांची निवड झाली होती. गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी उपसरपंच पदासाठी डॉक्टर पद्मसिंह विकास पॅनल कडून श्रीमंत फंड तर महाविकास आघाडी करून अविनाश आगाशे यांनी अर्ज भरले .होते . गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले होते. उपसरपंच निवडीमध्ये भाजप प्रणित पॅनलचे श्रीमंत फंड यांना तेरा सदस्यांनी मतदान केले तर महाविकास आघाडीचे अविनाश आगाशे यांना पाच मते मिळाली. 5 विरुद्ध 13 मतदान झाल्यामुळे श्रीमंत फंड यांची बहुमताने उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली.
महाविकास आघाडीचे सात सदस्य निवडून आले होते. त्यांची दोन मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे यावेळी दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तेर महसूल विभागाचे मंडळाधिकारी अनिल तीर्थकर यांनी काम पाहिले त्यांना ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी यांनी सहकार्य केले . नागरिकांतुन श्रीमंत फंड यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तर भाजप कार्यकर्त्यांनी आतिश बाजी करत आनंद उत्सव साजरा केला.