यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/ स्वरूप सुरोशे : महागाव तालुक्यातील पोखरी येथील शेतकऱ्याला ग्रामसेकाने फोनवर दिली धमकी. फोनवरून शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिसांनी संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात केला. अतिवृष्टीची रक्कम खात्यामध्ये जमा न झाल्यास शेतकऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला भ्रमणध्नीवरून विचारले असता ग्रामसेकाने अभद्र भाषेत शिवीगाळ केली शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेले एकही शेतकरी वंचित राहणार नाही अशी भूमिका राज्यशासनाने व्यक्त केली होती. पण लाच खोर व मुजोर कर्मचारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवत असून उलट ग्रामसेवकांनी शेतकऱ्यास अर्जव भाषेत अनुवाद करून धमक्या देत आहे.
महागांवतालुक्यातील पोखरी येथील शेतकऱ्याला विठ्ठल गव्हाणे यांनी ग्रामसेकाला अतिवृष्टीची रक्कम खात्यामध्ये जमा न झाल्याने पोखरी ग्रा. पं. येथील ग्रामसेवक अर्जुन हांडे यांच्याशी भ्रमणध्नीवरून संवाद साधला असता त्यांनी त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन न करता उलट एकदम खालच्या भाषेत शिवीगाळ करून गावात येऊन मारील अशी धमकी दिली. ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत असून संबधित ग्रामसेकावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.