खंडाळा (दिशा न्यूज़) /दादा धायगुडे : रासायनिक खत कंपन्या खत विक्रीबरोबर त्याचे इतर प्रोडक्ट लिंकिंग स्वरूपात कुषि सेवा केंद्र धारकांच्या माथी मारत असल्याने व याचा तोटा शेतकरी बांधवांना होत असल्या कारणाने शेतकरी हितासाठी सातारा जिल्ह्यातील कुषि सेवा केंद्र धारक खत कंपनीच्या लिकींग धोरणाला आळा बसावा या उद्देशाने बेमुदत संपाच्या तयारीत आहेत व त्यासंदर्भातील पुर्वकल्पना म्हणुन सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके डीलर असोशियनने जिल्हाअधिकारी, जिल्हा कुषि अधीक्षक, कुषि विकास अधिकारी सातारा यांना निवेदन दिले आहे. अनेक कंपन्या खत विक्री बरोबर इतर प्रोडक्ट दुकानदारांच्या माथी मारत आहेत.जर कंपनींचे इतर प्रोडक्ट घेतले नाही तर दुकानदारांना खतांचा पुरवठा केला जात नाही व याचा नाहक परिणाम बळीराजाला सोसावा लागत आहे.
खतांच्या किंमती वाढल्या असल्यामुळे ३ टणापर्यत प्रत्येक ग्रेडचे खत पोहोच मिळावे.बियाणांचा सॅम्पल फेल गेला तर कंपनींना दोषी धरावे अशा अनेक मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व कुषी सेवा केंद्र धारक दि. १६/१/२०२३ पासुन बेमुदत संप करण्याच्या तयारीत आहे. त्यासंदर्भातील पुर्व कल्पना म्हणून सातारा जिल्हा रासायनिक खते,बियाणे व किटकनाशके डीलर असोशियनने जिल्हाधिकारी, जिल्हा कुषि अधीक्षक,कुषि विकास अधिकारी सातारा यांना निवेदन दिले आहे.संप करण्याअगोदर लिकींग सदर्भातील लेखी आश्वासन कंपन्यांनी द्यावे व संपामुळे शेतकर्यांच्या नुकसानीस रासायनिक खत कंपन्यांना जबाबदार धरावे अशी विनंती असोसिएशनने लेखी पत्राद्वारे केली आहे.