प्रमोद डफळ (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदार यांना कळविण्यात येते की, सन 2022-2023 या वर्षाकरिता गाव नमुना नंबर 7 व 12 मध्ये रब्बी हंगामाची पिकपाहणी नोंदविणेची प्रक्रिया दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजीपासुन मोबाईल मधील ई पिक पाहणी व्हर्जन 2 च्या माध्यामातून सुरु झालेली आहे. सदरचे अॅप हे आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोअर वर ई पिक पाहणी व्हर्जन 2 म्हणुन आहे. तरी सर्व शेतकरी खातेदार यांनी लवकरात लवकर आपल्या मोबाईलमधुन आपल्या पिकाची नोंद करुन घ्यावी. पिक पाहणी करिता अंतिम मुदत दिनांक 31 जानेवारी 2023 पर्यंत आहे.
सर्व शेतकरी खातेदार यांनी विहित मुदतीत सन 2022-23 या वर्षाचा पिक पेरा नोंदवावा. जेणेकरुन शासनाच्या विविध प्रकारच्या योजना उदा. कृषी व फलोत्पादन, नैसर्गिक आपत्ती नुकसान, पिक विमा, शासकीय आधारभुत किंमत धान्य खरेदी योजना, खतांवरील सबसिडी इत्यादी योजनांचा फायदा घेता येईल. याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संबधित गावाचे तलाठी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिल कार्यालय, राहुरी यांचेवतीने करणेत येत आहे.