वसंत रांधवण /अहमदनगर प्रतिनिधी : दौंड येथे पार पडलेल्या दौंड रायझिंग इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये पारनेर तालुक्यातील जनता विद्या मंदिर कान्हूर पठार मधील शिक्षक सुहास गोरडे ११ किलोमीटर मध्ये धावून चौथा क्रमांक मिळवला त्यांच्या समवेत विद्यालयातील विद्यार्थिनी शेळके शिवानी ही पाच किलोमीटर स्पर्धा पार पाडून पाचवा क्रमांक मिळवला. त्यांना स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल मिळाले. सुहास गोरडे यांनी आत्तापर्यंत पुणे सातारा नाशिक अशा अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन वेटरन गटामध्ये यश मिळवले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी मॅरेथॉन कडे धावत आहेत विद्यालयाचे प्राचार्य श्री वमने बाबासाहेब पर्यवेक्षक, श्रीधुळे जयसिंग, श्री ठाणगे राघू विद्यालयातील स्कूल कमिटी सदस्य गावातील सरपंच उपसरपंच यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
Leave a reply