नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलिंद बच्छाव : राजेश पवार यांनी जिल्हा खरेदी विक्री संघाची जागेचा प्रश्न सहकार मंत्र्यांकडे नेऊन फार मोठा तीर मारल्याचा आव आणत आहेत परंतु गेल्या वीस वर्षापासून सदरील जमिन संबंधित शेतकऱ्यांना मिळावा म्हणून माझे बंधू सामाजिक भूमिका जोपासत चंद्रकांत पाटील चव्हाण यांनी व या जागेचे मूळ मालक गोविंद मानिका शिंदे व बालाजी गोविंद शिंदे हे गेल्या वीस वर्षापासून तालुका न्यायालय पासून ते हायकोर्ट लड्यापर्यंत ही जमीन जागा माझी आहे
चुकीच्या पद्धतीने तत्कालीन लोकांनी सत्तेचा वापर करून नावावर लावून घेतली म्हणून ही जागा परत मूळ मालकाला व्हवी द्यावी अशा पद्धतीची याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयासह केला आहे, जिल्हा खरेदी विक्री संघावर आवसायिक नेमल्यानंतर ही जागा बेकायदेशीर विक्रीस सन २००२ मध्ये निघाली होती
या विरोधामध्ये ही जमीन जागा माझे बंधू व मूळ मालक यांनी पुढाकार घेऊन आपल्या न्यायासाठी महसूल सह दिवानी न्यायालय मध्ये अनेक न्यायालयीन आदेश घेत चालू ठेवला आहे असे असताना ह्या जमिनीच्या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा बिन बुडाचा आरोप करत रिपाईचा आमदार राजेश पवार यांनी सहकार मंत्र्यांकडे पत्र दिले आहे
याप्रकरणा बरोबरच राजेश पवार यांनी घेतलेल्या नांदेड टेक्सटाईल मिल म्हणजेच टेक्स्टकाम मिल चालू करतो म्हणून घेऊन अद्यापही चालू करण्यात आलेली नाही महाराष्ट्र मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाची आणि नवतरुण युवक मजदूर कामगार बांधवांची दिशाभूल करून त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवलेले आहेत
हे पाप कुठे फेडावे आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब ही कंपनी तात्काळ ताब्यात घेतील का त्यावर चौकशी होईल का नवतरुण पोरांना त्या ठिकाणी काम मिळेल का म्हणजेच कंपनी चालू होईल का आपल्या पदाचा गैरवापर करत टेक्सटाइल टेस्टकॉम याची रीतसर चौकशी झाली पाहिजे व सदरील जागेत अवैध पद्धतीने व्यवसाय चालू आहे हे नाकारता येत नाही
कारण जिल्हाधिकारी यांना कंपनी चालू करतो म्हणून रीतसर अटी आणि नियमाच्या अधीन राहून कंपनी चालू करण्यात येईल अशी शपथ पत्र दिल्या नंतर देखील कायद्याची पायमल्ली करत खाजगी लोकांना या टेस्कॉम कंपनी मधील गोडाऊन इतर लोकांना भाडे तत्वावर देऊन लाखो रुपये उकळण्याचे काम चालू आहे
आणि तरुण कामगार मजदूर बांधवांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम रिपाईचे आमदार राजेश पवार हे करत आहेत यासह विविध बाबीचे पुराव्यासह माहिती उपलब्ध आहे योग्य वेळी नायगाव मतदार संघात तसेच नांदेड जिल्हातील सर्व बांधवांना लक्षात आणून देऊ
मा जिल्हाधिकारी नांदेड यांनी रीतसर चौकशी करून पूर्वत टेक्स्टाईल मिल टॅक्सकॉम ताब्यात घेण्याची कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पक्षाच्यावतीने रिपाईच्या आमदाराच्या विरोधात व प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी माझे राजेश पवारांना खुला आव्हान आहे त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी ही शेतीच्या कमाईतून आलेली आहे का
की त्यांचा असा कोणता उद्योग किंवा फॅक्टरी सुरू आहे त्याच्यातून कमाई झालेली आहे ती त्यांनी दाखवावे आम्हाला माहित आहे राजेश पवारांनी अशोक हॉटेल छत्रपती संभाजी नगर व राजस्थान येथील प्रॉपर्टीतून त्यांचे वडील व त्यांनी मोठ्या प्रमाणात कमाई केलेली आहे याचीही लवकरच आम्ही रीतसर तक्रार करणार आहोत रीपाई कोट्यातून आमदार झालेले राजेश पवार यांनी लोकांमध्ये गैरसमज पसरून मी फार स्वच्छ धुतल्या तांदळासारखा आहे असे चायना मॉडेल दाखवत आहेत
आणि इतर मात्र फार भ्रष्टाचारी आहेत अशा पद्धतीचा आव्हान आहे हो यापुढेही जाऊन मी गजानन पाटील चव्हाण राजेश पवार यांना खुले आव्हान करतो की त्यांच्याकडे असलेली मालमत्ता कुठल्या साधनातून निर्माण झालेले आहे हे जाहीर करावे व आपण धुतल्या तांदुळासारखे आहोत हे लोकांना दाखवून द्याव