संगमनेर प्रतिनिधी / युनूस बी. शेख : तालुक्यातील पठार भागात तीन दरोडे खोरांनी धुमाकूळ घालत मोठी दहशत माजवली आहे. घारगाव येथील एका टायर दुकानदारास मारहाण करून चाकूचा हल्ला केला व रिव्हॉलवरचा धाक दाखवत मोटर सायकल मोबाइल फोन,रोख रक्कम घेऊन पुढे साकुर परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकला यात रिव्हॉल्वरचा धाक दाखवत मोठी रोख रक्कम लुटत पोबारा केला असल्याची धक्कादायक घटना रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे.
रविवारी रात्री पठार भागात तीन दरोडेखोर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दिशेकडून घारगाव येथे बस स्थानकाजवळ असलेल्या टायर दुकानावर आले. दुकानदार मालक अनुदेव अनंत ओटूशेरी यांना मारहाण करत चाकूने हल्ला केला.१ हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला.तसेच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांचे कडील मोटरसायकल क्रमांक एम एच १७ सी ए ७२०७ मोटर सायकल घेऊन दुसरा दरोडा टाकण्यासाठी साकुरला पोहचले.तर जखमी पीडित उपचार घेत आहे.
रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हे तीन दरोडेखोर साकुर येथील भगवान पेट्रोलियम (इंडियन ऑईल) पंपावर पोहचले असता तेथील सेल्समन सुनील हरिभाऊ गीरे व विलास भाऊसाहेब कातोरे यांनी दिवसभर विक्री केलेल्या डिझेल तसेच पेट्रोलचा हिशोब करत पंपावरील कॅबिन मध्ये बसले होते.या दरम्यान पंपावर दोन मोटर सायकलवर तिघे जन पेट्रोल भरण्यासाठी आल्याचे दिसले.यावेळी विलास कातोरे त्यांना पेट्रोल भरण्यासाठी गेले आणि सुनील गिरे कॅबिन मधील टेबलावर पैसे मोजत बसला होता.पेट्रोल भरून झाल्यानंतर पैसे न देतात अंदाजे २० ते २५ वय वर्ष असलेले लाल जरकिंग घातलेले दोघे जण तर २८ ते ३० वय वर्ष असलेला पिवळ्या रंगाचे जरकींग घातलेला तिसरा दरोडेखोर असे तिघांनी पण तोंडाला काळ्या कपड्यांनी तोंड झाकलेले होते.हे तिघे कॅबिन मधे आले यावेळी एकाच्या हातात रिव्हॉलवर होता.
यावेळी लाल रंगाचे जरकिंग घातलेल्या दरोडे खोराने रिव्हॉल्वरचा धाक दाखवत सगळी रक्कम देऊन टाका नाहीतर दोघांना गोळ्या घालून मारून टाकील अशी धमकी देत दहशत माजवली.तर पिवळे जरकिंग घातलेल्या दरोडेखोराने टेबलमधील ड्रॉवरमध्ये ठेवलेली काळ्या रंगाची पिशवी काढून घेतली.तर लाल जरकिंग घातलेल्या दरोडे खोराने सुनील गीरे मोजत असलेली रक्कम हिसकावून घेतली. व मांडवे गावचे दिशेने निघून गेले.तर या दरोड्यात २,५०,७४७ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
दरम्यान घाबरलेल्या गीरे आणि कातोरे या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आरडा _ओरडा केल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली.झालेला प्रकार पंप मालक आदिकराव खेमनर व मॅनेजर दत्ता शेंडगे यांना कळविला. घडलेल्या दरोड्याच्या प्रकारानुसार सेल्समन सुनील गीरे यांच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांत तिघा अज्ञात दरोडेखोरान विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर करत आहे.
दरम्यान दरोडेखोरांच्या लुटीने पठार भाग हादरला आहे. पुणे नाशिक महामार्गावर दुचाकीस्वारास अडवून दुचाकी,रोख रक्कम व कागदपत्रे घेऊन चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना ताजी असतानाच घारगांवात मोबाईल शॉपी फोडून चोरी झाली होती.तर टायर दुकानदार व पेट्रोल पंपावर रिव्हॉल्वर,चाकूचा धाक दाखवून दरोडा पडल्याने पठार भाग हादरला असून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणे घारगांव पोलिसांपूढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Leave a reply