संगमनेर प्रतिनिधी / युनूस बी. शेख : संगमनेर तालुक्यातील झोळे येथील युवक तरूण हा अचानक बेपत्ता झाल्याने झोळे परीसरात खळबळ जनक माहिती समोर आली आहे.
सविस्तर माहिती अशी कि संगमनेर तालुक्यातील झोळे येथील महेश किसन येवले वय 29 हा फेब्रुवारी 12 तारखेपासून बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच संगमनेर तालुक्यातील पंचक्रोशीत व झोळे पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली असून महेश येवले याच्या अचानक बेपत्ता झाल्याचे कारण काय आहे ? महेश येवले याचा शोध हा मित्र परिवार, सगे सोयरे हे वणवण भटकत असून त्याचा शोध कसून सुरू असून कोणत्याही प्रकारचा तपास लागला नसून महेश येवले याचे काका संपत मालुंजकर यांनी संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार संपत मालूंजकर यांचे साडू किसन मारुती येवले राहणार झोळे ता.संगमनेर यांचा महेश हा बेपत्ता झालेला मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून महेश येवले हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.30 ते 12.00 या सुमारास महेश हा काका संपत मालूंजकर रा. गणेश विहार फेज टू मालदाड रोड घुलेवाडी यांच्या घरी आला होता नंतर तो त्याची मोटारसायकल काकांच्या घरी लावून मावशी अनिता हिस मुंबई चे डॉ. संगमनेर येथे येणार असल्याने त्यांच्याकडे जाऊन येतो असे सांगत महेश हा काकांच्या घरून गेला असता बराच वेळ उलटूनही तो माघारी आला नसल्याने नातेवाईक व मित्रपरिवार यांनी संगमनेर शहरासह संपुर्ण तालुक्यातील पंचक्रोशीत महेशचा शोध घेतला परंतु महेश सापडला नसल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महेश बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हा निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याची माहिती मिळाली आहे.
Leave a reply