Disha Shakti

Uncategorized

पोहंडूळ ग्रामपंचायतने जुन २०२२ मध्ये शाळा डिस्मेंटल करून साहित्याची निलामी केलेल्या रकमेचा हिशोब द्यावा : संतोष सोळंके

Spread the love

यवतमाळ प्रतिनिधी / स्वरूप सुरशे : पोहंडूळ ग्रामपंचायत ने जुन २०२२ मध्ये शाळा डिस्मेंटल करून साहित्याची निलामी केली व ती निलामी ६९००० रुपया मध्ये गावातील रहिवासी संतोष सोळंके यांनी घेतली. त्यांनी ग्रामपंचायत च्या खात्यामध्ये नियमाप्रमाणे ती रक्कम सुद्धा भरली. परंतु ती रक्कम सरपंच यांनी कोणत्याही विकास कामा करिता न वापरता स्वतः कधी ५००० रुपये तर कधी ३००० रुपये या प्रमाणे वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी न घेता काढून घेतली आहे. सरपंच यांना काही अधिकार असतात , ५००० रुपये पेक्षा कमी असलेल्या व्यवहार करिता कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता नाही. नेमका त्याच अधिकारचा गैरफायदा घेत सरपंच यांनी युक्ती लडवत ५००० रुपये पेक्षा कमी रक्कम चे चेक सचिव सरपंच यांच्या स्वाक्षरी ने टप्पा टप्पाने रक्कम फस्त केली आहे.

आज रोजी ग्रामपंचायत पोहंडूळ च्या सामान्य निधी खात्या मध्ये १००० रुपये सुद्धा शिल्लक नाही. कर्मचारी मानधन सुद्धा नियमित होत नाही. गृहकर पाणी कर वसुली केलेली रक्कम, दुकान गाळे ची वसुली रक्कम, शाळा निलामी साहित्याची रक्कम गेली कुठे हा प्रश्न गावाकऱ्या पुढे पडला आहे. सरपंच महोदयांनी गृहकर व पाणीकर वसुली करिता कोर्टा द्वारे नोटीस देऊन वसुली करून घेतली. परंतु एवढा मोठा निधी गेला कुठे या प्रश्नाचे उत्तर गावकऱ्यांना मिळाले नाही. ग्रामसभे मध्ये विषय घेतला असता सरपंच महोदय दिनेश रावते ग्रामसभेच्या विषय सुची मध्ये विषय नसल्याचे कारण पुढे करत विषयावर बोलणे टाळतात. एवढा मोठा ग्रामनिधीचा दुरुपयोग होत असल्यामुळे भष्ट सरपंचावर कार्यवाही होत नाही तो पर्यंत गावातील लोकांनी कराचा भरणा करू नये. व सरपंच विरोधात कठोर कार्यवाही प्रशासनाने करून भष्ट सरपंचावर लगाम लावावी अशी मागणी गावातील जागरूक नागरिक करीत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!