Disha Shakti

Uncategorized

बिरेवाडी शिवारात अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

प्रतिनिधी / शेख युनुस : संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बिरेवाडी शिवारात 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ‌ सविस्तर माहिती अशी की,बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळील एका शेतकऱ्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये 16 वर्षीय मयत दिपक गोरख केदार रा. चिखलठाण (बोंबलदरा ) ता. राहुरी असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव असल्याचे समजले. पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ही मंगळवार दि. 7 मार्चला दुपारच्या दरम्यान घडली.राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथील आदिवासी पाड्यातील बोंबलदरा येथील गोरख अंजाबापू केदार यांचे कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी साकूर येथील परिसरात बोकड्याच्या माळावर बिरेवाडी येथील वैभव दत्तात्रय सागर यांच्या शेतातील गट नंबर 363 मधील शेडमध्ये राहत होते.गोरख केदार हे आपल्या पत्नी अलका केदार, मुलगा संदीप केदार, सुन चित्रा केदार यांच्या समवेत कामासाठी गेले दिपक हा लहानपणापासून मूकबधिर असल्याचे समजले असून तो एकटाच शेडवर होता. गोरख केदार घरी परतल्यावर त्यांना आपल्या मुलाचा गळफास अवस्थेत दिसला.त्यांनी आरडा ओरड केली असता शेजारील शेतावरील आपल्या कुटुंबातील सदस्य धावत आले.

या घटनेची माहिती घारगांव पोलीसांना मिळताच पोलीस निरिक्षक संतोष खेडकर, पोलीस कॉन्सटेबल बिरे, पोलीस कॉन्सटेबल चव्हाण, पोलीस कॉन्सटेबल बांडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह खाली घेऊन शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!