Disha Shakti

Uncategorized

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आक्रमक! पत्रकारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा

Spread the love

दिशा शक्ती प्रतिनिधी / युनूस शेख : माझ्या वडिलांच्या विरोधात बातमी का लावली याचा जाब विचारत निंगणुर येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांच्यावर ओम प्रकाश मुडे नामक व्यक्तीने हल्ला करत शिवीगाळ केली आहे. सदर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड, ढाणकी व पोफळी येथील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, निंगणूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष या पदावर गेल्या सोळा वर्षांपासून आपला डेरा टाकून बसलेल्या मुडे नामक व्यक्तीची बातमी सौदागर यांनी वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती. त्याचा राग मनात धरून ओम प्रकाश मुडे यांनी पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर हल्ला केला. मनोद्दीन सौदागर यांच्यावरचा हल्ला म्हणजे समस्त पत्रकारांवरचा हल्ला आहे. यामुळे पत्रकारांची गळचेपी होईल व पत्रकारांचं स्वातंत्र्य धोक्यात येऊन लोकशाहीची पायमल्ली होण्यास वेळ लागणार नाही म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने बीटरगाव, उमरखेड व पोफळी गाठत ठाणेदाराना निवेदन दिले व दोशीवर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियमन २०१७ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनील राठोड, उदय पुंडे, मैनोद्दीन सौदागर, संजय जाधव, अशोक गायकवाड, बंटी फुलकोंडवार, शैलेश कोरडे, मोहन कळमकर, संदेश कांबळे, सुनील ठाकरे, गजानन वानखेडे, सय्यद रजा, सिद्धार्थ दिवेकर, जिल्हा महिला अध्यक्षा अर्चना भोपळे, विवेक जळके, राजेश पिटलेवाड वसंता नरवाडे शेख इरफान, सविता घुंगरे भागवत काळे, ब्रह्मानंद मुनेश्वर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!