Disha Shakti

Uncategorized

गोटूंबे आखाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Spread the love

प्रतिनिधी /रमेश खेमनर : राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे दिनांक 11 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहापूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास इयत्ता 1 ली ते 8 पर्यंन्तच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर बहारदार नृत्य सादर केले.तसेच वार्षिक सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी संदीप बाचकर व श्रध्दा माने यांना  माजी मंत्री  व आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या  हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद विभागाचे  आयकर उपायुक्त श्री.विष्णू औटी सर (IRS)  हे होते त्यांनी व्हेरॉक फाउंडेशनच्या माध्यमातून एक कलर प्रिंटर व स्मार्ट टीव्ही या शाळेस भेट दिला तसेच या कार्यक्रमास प्रमूख उपस्थिती  माजी राज्यमंत्रीआमदार प्राजक्त दादा तनपुरे सहाय्यक पोलीस  निरिक्षक शरद गायमुखे, गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन सर, विस्तार अधिकारी श्री. अर्जूनराव गारूडकर साहेब, श्रीमती छाया काकडे मॅडम, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सडे केंद्रप्रमुख श्री. रविंद्र थोरात साहेब व पिंपरी अवघडचे शिक्षक अनिल पवार सर यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी सरपंच सरपंच मालती ताई साखरे, उप सरपंच तुकाराम बाचकर, मधुकर साळवे, ग्रामपंचायत सदस्य मनीषाताई शेंडगे, मीनाताई घोकसे, शिवाजी पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, शिक्षण तज्ञ जालिंदर शेडगे, सदस्या राजश्री पटारे, शीतल अंकुश दवणे, अनिल थोरात, दिपक ढोणे, दादा हारदे प्रहार शाखा अध्यक्ष दत्तात्रय खेमनर, माजी सरपंच रवींद्र चौधरी, सचिन शेटे,_बिलाल भाई शेख, अक्षय डहाळे, सचिन सोळशे, मनोज घोकसे, बापूसाहेब होडगर, अंकुश दवणे, निलेश बीडगर, आण्णासाहेब बाचकर, सखाराम बाचकर, रवी निकम, परसराम साखरे शिक्षक राऊत सर, आव्हाड सर आदींसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जपकर मॅडम, मोरे मॅडम, गायकवाड मॅडम, साळवे मॅडम, कल्हापुरे मॅडम, वनारसे मॅडम, निमसे मॅडम, राऊत मॅडम, तसेच पिंपरी अवघड शाळेचे शिक्षक श्री. अनिल पवार सर व नावाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्यासाठी श्री.अनिल शेरमाळे, व सर्व महीला शिक्षिकानी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापीका श्रीमती जपकर मॅडम यांनी केले.सूत्रसंचालन सौ.गायकवाड मॅडम व अनिल पवार सर यांनी तर आभार साळवे मॅडम यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!