संगमनेर प्रतिनिधी /शेख युनुस : संगमनेर तालुक्यातील पंचक्रोशीत नावाजलेले कणखर आदर्श व्यक्तिमत्व गोर गरीबांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभे राहून न्याय देणारे स्व.अशोकराव (आबा) पाटील खेमनर यांच्या 60 व्या जयंतीनिमित्त विद्याप्रबोधनी शाळेच्या वतीने विविध उपक्रमांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साकूर पठार भागातील स्व.अशोकराव (आबा)पाटील खेमनर यांच्या अचानक दुःखद निधनाने सामान्य जनतेच्या व मित्रपरिवार आणि कुटुंबियांना आपल्या सहकार्याच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळलेला असून आबांची आठवण ही क्षणा क्षणाला येते.
आबांच्या सामाजिक क्षेत्रातील असलेल्या कामाची पावती आजही साकूर पठार पंचक्रोशीत ठसा उमटून आहे. शालेय शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील सुख सुविधा ह्या स्व.आबांच्या आठवणींना उजाळा देत आहे. स्व. अशोकराव (आबा) पाटील खेमनर यांनी विद्याप्रबोधनी शाळेची स्थापना करून वटवृक्षाचे छोटासे रोपटे लावून आता ह्या रोपट्याचे भल्या मोठया वटवृक्षात रूपांतर करण्यात त्यांचे मोठे चिरंजीव संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व साकूर सोसायटीचे चेअरमन युवक कार्यकर्ते माननीय इंद्रजित पाटील यांचा लाख मोलाची साथ आहे. दरसाल दरवर्षी स्व.अशोकराव (आबांची) पुण्यतिथी जयंतीनिमित्त विद्याप्रबोधनी प्रशालेत विविध उपक्रमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या वर्षी ही जय्यत तयारी सूरू आहे. स्व. आबांची जयंतीनिमित्त दिनांक 15 मार्च ला विद्याप्रबोधनी प्रशालेत सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला आहे.
साकूर पंचक्रोशीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकूर, उर्दू शाळा साकूर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी पठार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेपठार,हळदे वस्ती, चितळकर वस्ती, चिंचेवाडी, हिरेवाडी, जांभुळवाडी, तास्करवाडी, आनंदवाडी,आदी शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. साकूर गावातील बिरोबा मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, सावता महाराज मंदिर, शनि मंदिर, संत गोरोबा मंदिर, संत नामदेव महाराज मंदिर, गणपती मंदिर, स्वामी समर्थ मंदिर,मारुती मंदिर, तसेच चर्च ,बौध्द विहार, मस्जिद उर्दू शाळा,आदी धार्मिक स्थळांची साफसफाई करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे. साकूर येथील नावाजलेले गोर गरीबांचे आईचे वात्सल्य देणारे मातोश्री हॉस्पीटल साकूर येथे डॉ. पवनकुमार खेमनर पाटील यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असून या शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना प्रत्येकाला एक एक केशर आंब्याच्या झाडांची रोपटे वाटप करण्यात येणार आहे. रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आव्हान मातोश्री हॉस्पीटल चे डॉ. पवनकुमार खेमनर पाटील यांनी केले आहे.