Disha Shakti

क्राईम

चैन स्नॅचिंग करणारे टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, अहमदनगर जिल्ह्यातील १४ गुन्हे उघड, १७,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी नामे सौ. रुपाली सुधीर कदम वय ३२ वर्षे, रा. दत्तनगर, श्रीरामपुर या दिनांक २०/०४/२०२४ रोजी त्यांचे पतीसोबत श्रीरामपुर ते बाभळेश्वर रोडने जात असतांना ०२ अनोळखी आरोपींनी मोटारसायकलवर भरधाव वेगात येवुन फिर्यादीचे गळ्यातील ४५,०००/- रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण बळजबरीने ओढुन तोडुन चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४७६/२०२४ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये चैनस्नॅचिंगच्या वारंवार घटना होत असल्याने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर गुन्ह्यामधील आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या आहेत.

नमुद आदेशान्वये दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, संतोष लोढे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, रणजित जाधव, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, अमृत आढाव, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन अहमदनगर जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथकाने अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर, श्रीरामपुर, शिर्डी, कोपरगांव, शेवगांव या ठिकाणी झालेल्या चैन स्नॅचिंग ठिकाणी भेटी देवुन गुन्हा ठिकाणचे व आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त केले होते. प्राप्त फुटेजची पाहणी करुन फुटेजमधील संशयीत आरोपींचे फोटो गुप्त बातमीदारांना प्रसारित करण्यात आले होते.

दिनांक २२/०५/२०२४ रोजी पोनि श्री दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद ऊर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपुर याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो त्याचे साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागीने विक्री करीता श्रीरामपुर ते नेवासा जाणारे रोडवरील अशोकनगर फाटा येथे येणार असल्याची बातमी मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार पथकाने अशोकनगर फाटा, ता. श्रीरामपुर येथे जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील आरोपी विनोद ऊर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण व त्याचा एक साथीदार असे पथकास अशोकनगर फाटा येथे येतांना दिसल्याने पथक सदर आरोपींना ताब्यात घेणेकामी जात असतांना ते तेथुन पळून जाण्याचे प्रयत्नांत असतांना त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण वय २६ वर्षे, रा. मोहटादेवी मंदीरामागे, अशोकनगर, ता. श्रीरामपुर, २) सुनिल शानिल पिंपळे वय ३७ वर्षे, रा. वसु सायगांव, ता. गंगापुर, जि. छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अहमदनगर जिल्ह्यातील चैनस्नॅचिंगचे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने तपास करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे ३) विशाल सुनिल पिंपळे वय २२ वर्षे, रा. वसु सायगांव, ता. गंगापुर, जि. छ. संभाजीनगर, ४) राजेश राजु सौलंकी रा. सुहागपुर, जि. हौशीगाबाद, मध्यप्रदेश, (फरार), ५) ऋषिकेश कैलास जाधव रा. श्रीरामपुर, (फरार), ६) रंगनाथ उर्फ रंग्या युवराज काळे रा. सदर (फरार) यांचेसह गुन्हे केल्याचे सांगितले. सदर आरोपींचा शोध घेता विशाल सुनिल पिंपळे हा मिळुन आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे १) विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण, २) सुनिल शानिल पिंपळे, ३) विशाल सुनिल पिंपळे यांचेकडुन १५,०५,०००/- रुपये किमतीचे २१५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १,००,०००/- होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल, १,१५,०००/- रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल फोन असा एकुण १७,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!