Disha Shakti

Uncategorized

चांदशहावली बाबा यात्रेनिमित्त मांडवे बु! येथे विविध मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी /युनूस शेख : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व जिल्ह्यात तसेच संगमनेर तालुक्यातील मांडवे बु! गावचे आराध्य दैवत असलेले चांदशहावली बाबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भक्त भाविकांसाठी मनोरंजन कार्यक्रम लोकनाट्य तमाशा, व हगामा आयोजित करण्यात आला आहे. ‌

सविस्तर माहिती अशी कि मांडवे बु! येथील चांदशहावली बाबा दर्गाचे भक्तबाबा बुढणभाई शेख यांनी आव्हान केले आहे कि येणाऱ्या भक्त भाविकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सोमवार दिनांक 27 मार्च रोजी संदलचा कार्यक्रम हा रात्री 9.10 पासून 11.30 पर्यंत मोठ्या थाटामाटात होणार आहे. मंगळवार दिनांक 28 मार्च ला रात्री छबीना व लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 29 मार्चला दुपारी हगामा ठेवण्यात आला आहे दु.2.30 ते 7.30 ला पर्यंत असेल तरी संपूर्ण भक्त भाविकांनी चांदशहावली बाबा यात्रेनिमित्त उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!