दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : दि :11/04/2023 रोजी धनगर समाज संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या गैरकारभाराची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई येथे मुख्यमंत्री साहेबांचे मुख्य सचिव व पशुवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सचिव यांच्याकडे देण्यात आले.
१) महाविकास आघाडी सरकारणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे संचालक मंडळाचे बदललेले संचालक मंडळ पूर्वी जसे होते तसेच ठेवण्यात यावे. २) महामंडळाच्या शंभर कोटी निधीमधून महादेव योजनेप्रमाणे धनगर समाजासाठी शेळयांची योजना ही शंभर टक्के अनुदान देऊन राबवावी. जशी पारधी विकास योजना राबवली जाते.
३)महामंडळ शेळया मेंढया पुरवठेदार हे प्राधान्याने धनगर समाजाचे असावेत. ४)धनगर समाजातील बेरोजगार युवक, युवतींना शेळया मेंढयाचा व्यवसाय
करण्यासाठी महामंडळाला निधी उपलब्ध करुन दयावा.
५) महामंडळाचे पाच प्रक्षेत्र बंद करण्याचा मंत्री महोदयांचा सूचना ऐकण्यात येत आहेत. तो निर्णय मागे घ्यावा.
६) महामंडळाच्या भागभांडवल मधून कमिशनसाठी अनावश्यक झालेल्या खोरी आणि त्यात करोडो रुपयांचा झालेला भ्रष्टाचार याची चौकशी लावावी आणि दोषीकडुन वसुली करावी., ७) महामंडळात पई पई जमा करून एफ.डी जमा केलीली मंडळ कमिशन खोरीच्या कामासाठी लावावी आणि दोषीकडून वसूल करावी. अस मंडळात कधीच झाले नसल्याच्या चर्चा सुरू आहे.त्याची चौकशी झाली पाहिजे, ८) खरेदी केलेली बिले कशी काढली याची चौकशी झाली पाहिजे., ९) महाव्यवस्थापक डॉक्टर साळवे यांनी लाखो रुपयांचा पैशाचा व्यवहार करून पात्रता नसताना प्रमोशन करून घेतले याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे., १०) ठराविक ठेकेदारांकडून कमिशन खोरीत शेडची कामे व इतर कामे केलेल्या कामांची चौकशी करावी., ११) आणाठाई खर्च केलेले व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापक या प्रामुख्यांची चौकशी करून कारवाई व महामंडळाचे केलेले नुकसान भरपाई करावी. १२) मेंढी व शेळी पालन हा धनगर समाजाचा पारंपारिक व्यवसाय राहिलेला आहे.या उद्योगाला चालना देण्यासाठी धनगर समाजातील बेरोजगार युवक युवती यांच्यासाठी पुरवठेदार तयार होण्यासाठी ठोस पाऊल उचलावे. पाळण, व्यवस्थापन आणि विक्री या तत्त्वावर समाजाला स्थान देण्यात येऊन बाहेरचे पुरवठेदार यांचे मंडळातील स्थान काढून टाका.
या निवेदनामध्ये वरील सर्व विषयांची मागणी करण्यात आली यावेळी धनगर समाज सेवा संस्था प्रदेशाध्यक्ष श्री नवनाथजी ढगे साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष सौ.संगीता ताई ढोके मॅडम, महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री दत्तात्रयजी चोरमले साहेब, श्री चंद्रशेखरजी मदने साहेब, श्री सितारामजी ठोकरे उपस्थित होते.