श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 मुलांचा बाप असणाऱ्या आरोपी ताहेर यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. 19 तारखेला मालुंजा परिसरातून एक 16 ‘वर्षांची अल्पवयीन मुलगी सकाळी 10 वा. आपल्या राहात्या घरातून बेपत्ता झाली होती. सदर मुलीचा शोध सर्वत्र घेतल्यानंतर ती आढळली नाही म्हणून 20 तारखेला तिच्या घरच्यांनी पोलिसांनी तक्रार दिल्यावरून भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना समजले की, 2-3 वर्षांपूर्वी सदर मुलीच्या घरचे हे पुण्याला वीट भट्टीवर काम करायला राहत होते. त्याठिकाणी एक टेम्पो चालक ताहेर शेख, वय – 28 याच्याशी या कुटूंबाची ओळख झाली. त्यानंतर सदर मालुंजे येथील कुटूंब पुण्याहून पुन्हा मालुंजा येथे आले. पुणे येथून हा टेम्पो चालक घटना घडली त्यादिवशी 19 तारखेला मालुंजा परिसरात आला होता. सदर मुलीच्या तो संपर्कात होता. त्याने मुलीला फूस लावून, आमीष दाखवून मालुंजा, ता.श्रीरामपूर येथून पुण्याला पळवून नेले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर टेम्पोचालक ताहेर शेख याचा तपास करत सदर अल्पवयीन मुलीसह त्याला ताब्यात घेवून श्रीरामपूरला आणले आहे. सदर आरोपी ताहेर शेख याचे लग्न झालेले असून त्याला दोन मुलं असल्याचे समजते. त्याच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसांत बलात्कार केल्याचा भादंवि कलम 376 तसेच अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोनि.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिंदे हे करीत आहेत
Leave a reply