अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकता फाउंडेशन नागपूर कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित साधून फाउंडेशन कडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आलेले होते या पुरस्कारासाठी शेवगाव येथील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा
राष्ट्रीय अटल फाउंडेशनचे राज्य कार्यकारी अध्यक्ष डॉ.धर्मराज सुरोसे यांची निवड झाली असल्याचे एकता फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजयजी रामटेके यांनी दिली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील , खा.डॉ सुजय दादा विखे पाटील , आ.मोनिकाताई राजळे, आ. रामजी शिंदे , मा.आ.बबनराव पाचपुते , मा. आ.शिवाजीराव कर्डिले मा.आ.बाळासाहेब मुरकुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ मुंडे मा.अभय आगरकर आदी मान्यवर तसेच समाजिक संस्थानी डॉ.सुरोसे यांचे विशेष अभिनंदन होत आहे.