अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनूस : अहमदनगर जिल्ह्यातील मद्यवर्ती महत्वाचे समजले जाणाऱ्या राहुरी बस स्थानकाची दुरावस्था मोठया प्रमाणावर बिकट असून येणाऱ्या प्रवासासाठी धोकादायक बनली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जागतिक कीर्तीचे देवस्थान शिर्डी चे साई बाबा व शनी शिंगनापूर या ठिकाणी हजारो भक्त भाविक हे राहुरी येथील बस स्थानकावरून बस ने प्रवास करतात. राहुरी येथील बस स्थानक हे पन्नास वर्षी पूर्वी बांधकाम झालेले असून सध्या हे बस स्थानक अखेरची घटका मोजत असून येणाऱ्या प्रवासी जनतेच्या प्रवासासाठी धोकादायक बनले आहे.
येथील उपहार गृह हे सात ते आठ वर्ष्यापासून बंद झालेले आहे.उपहार गृह बंद असल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.बस स्थानकच्या आवारात मोठ मोठे खडे पडले असून प्रवाशी व शालेय विद्यार्थी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बस स्थानक इमारतीवरील भिंतीना मोठ मोठे तडे गेलेले आहे.
राहूरी बस स्थानकाची दुरावस्था लक्षात घेताच जेष्ठ नेते व खासदार प्रसाद तनपुरे यांनी जानेवारी 2021ला आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी केली होती.सभेत या बस स्थानकाच्या बांधकामासाठी मागणी मान्य केली असता या साठी घोषणा देण्यात आली होती.
माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मे 2019मध्ये राज्य शासनाकडून 17 कोटी 25 लाख रुपयाची मान्यता मिळाली असून 11 फेब्रुवारी 2022 रोजी शासनाच्या आदेसानुसार पाच कोटी रुपयाचा निधीला मान्यता देण्यात आली.मध्यंतरीच्या काळात आघाडी सरकार गेले आणि शिंदे फडणवीस सरकार हे युती करून राज्यात सत्तेवर आले आणि आघाडी सरकारची मंजूर झालेली कामे स्थागित करण्यात आली असल्याने राहुरी बस स्थानकाची अवस्था जैसी की तैसी राहिली. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सांगितले की सरकार कुठले ही असो आणि कुणाचे हे असो प्रवासी जनतेच्या हितासाठी राहुरी बस स्थानकाची इमारत झालीच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.