Disha Shakti

सामाजिक

अभिनव प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय अभोणा येथे वृक्षारोपण व वन्य पशु दिन साजरा

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : भारतात दरवर्षी वन्यजीव १ते ७ ऑक्टोबर सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे.कोणताही वन्यजीव स्वत:हून माणसांवर हल्ला करत नाही. परंतु त्यांच्या राहण्याच्या क्षेत्रावर ( अधिवासावर) शेती, रस्ते वा बांधकामाच्या रूपाने होणारे मानवी आक्रमण मर्यादेपलीकडे गेले की ते जंगलाच्या सीमेवरील खेड्यांत घुसून मुख्यत: पोटासाठी गाई गुरे मारतात व त्यातून मानव- वन्यजीव असा लढा उद्भवतो.

भारतासहित जगातील मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही.जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमी विरोध दर्शवावा. म्हणून अभिनव प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय अभोणा ता. कळवण जि. नाशिक याठिकाणी वृक्षारोपण व वन्य पशु दिन साजरा करण्यात आला

यावेळी प्रथम श्री सरस्वती मातेची पूजा करून, अशोका, कडुनिंब,जामन, पिपादा,सोनचाफा असे 25 वृक्ष (रोपे) लावून दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित जय योगेश्वर भगवान सामाजिक व शौक्षणिक मंडळ विंचूरे ता. सटाणा. जि. नाशिक सचिव मा. सौ. संगीताताई गायकवाड श्री. विकेश हिरामण बागुल सर मुख्याध्यापक, श्री. सचिन बागुल सर उपमुख्याध्यापक,श्री. प्रदीप गवळी, श्री.गणेश शिंदे सर , श्री.शरद बिरारी सर,श्री.मयूर मगर सर ,दक्ष स्वयंसेवक फौंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. विठ्ठल ठोंबरे, उपाध्यक्ष श्री. ऍड. अमोल रंजाळे, स्वराज्य संघटनेचे राहाता तालुका अध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुमावत,श्री दिपक शेळके, श्री अमोल लेंडे, श्री. ऍड. अजय मूर्तडक, श्री.विशाल गोरे, श्री. ऍड. प्रकाश बेंद्रे आदी मन्यावर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!