बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : दि.22 मे रोजी परभणी येथे आयोजित बुरुड समाज सामूहिक विवाह मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व विवाह जमलेल्या वधू वरांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावी असे आवाहन शाहू वासमवार यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व बुरुड समाज बांधवांना नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेच्या वतीने जाहिर आवाहन करण्यात येते की, परभणी येथे आयोजित बुरुड समाजाचा भव्य दिव्य सामूहिक विवाह मेळावा 22 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा अयरकंडीशन मंगल कार्यालय मध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित महाराष्ट्र राज्यातील समाज बांधव तसेच समाजाचे वरिष्ठ नेते नागरीक युवा तसेच महिला पदाधिकारी, जेष्ठ नागरीक व प्रतिष्ठित व्यापारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तरी नांदेड जिल्ह्यातील विवाह जमलेल्या वधू वरांनी आपली नावे लवकर विवाह मेळाव्यात नोंदवावी असे आवाहन नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेचे अध्यक्ष शाहु बाबुराव वासमवार, व्यंकट महाराज गुळवे, गोविंद सोनवणे, साईनाथ नागेश्वर, माधव गुळवे, माधव सोनवणे, चिंटू जोरगेवार, गणेश वासमयार, सुनिल गुळये, संजू जोरगेवार, गणेश सुनेवाड, आनंद नागेश्वर, किशोर येनगंवा आदिनी केले आहे.