राहाता प्रतिनिधी / दिपक सोलाट : 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभ प्रसंगी JP news मराठी यू ट्यूब चॅनल चा वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.Jp News मराठी हे चॅनल गोरगरीब, अन्यायग्रस्त तसेच शेतकरी वर्ग या लोकांच्या हक्क अधिकारासाठी लोकशाही मार्गाने वाचा फोडण्यासाठी या JP न्यूज ची सुरुवात करण्यात आली आपल्या सर्वांच्या सहकार्य व आशीर्वाद घेऊन हे न्यूज चॅनल अन्याय होणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ असेल.या JP news चॅनल च्या वर्धापन दिनानिमित्त आपण करत असलेल्या सामाजिक, शौक्षणिक , क्रिडांगण,वृक्षारोपण व वेगवेगळ्या योजना राबविणे . आपले कार्य लक्षात घेऊन श्री. विठठल ठोंबरे पाटील संस्थापक अध्यक्ष दक्ष स्वयंसेवक फौंडेशन अहमदनगर यांना JP News मराठी सन्मानचिन्ह आदरणीय सौ.जयश्रीताई पाटील (मुख्य संपादिका ),मा.श्री. दिपकदादा पाटील उद्योजक, गोल्ड मॅन, (आखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभा महाराष्ट्र युवा अध्यक्ष कानसा, वारणा संस्थापक अध्यक्ष), मा.श्री जुबेरभाई सोडावाला भारतीय गौरक्षा मंच गुजरात राज्य संगठन मंत्री, श्री. अजय शर्मा (कार्यकारी संपादक) पत्रकार वर्ग यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
दक्ष स्वयंसेवक फौंडेशन अहमदनगर पुढील काळात यापेक्षाही चांगले कार्य करतील त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा