प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : भारतीय मजदूर संघाची जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत स्तरावरील शाखा नेवासा येथे स्थापन करण्यात आली. नेवासा नगरपंचायत येथील कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या रोजगाराची व भविष्य निर्वाहनाची हमी मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघाची जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत स्तरावरील शाखा स्थापन करण्यासाठी अखिल भारतीय मजदूर संघाचे प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर तसेच प्रदेश सचिव राधेश्याम कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय दुधाने होते. तर पालिका कार्यवाह संजय कांबळे, पुणे विभाग प्रमुख अर्जुन चव्हाण, अहमदनगरचे सचिव कृष्णा साठे, अनुलोमचे बाळासाहेब मुळे, इंजिनिअर नगरसेवक सुनील वाघ, तालुका कार्यवाह डॉ. सुनिल सावंत, सतीश मुळे व दत्तात्रय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.