विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : भीम पॅंथर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जाफराबाद गावांमध्ये कब्रस्तान सुरक्षा भिंत ( वॉल कंपाउंड) कामाची पाहणी करण्यात आली जिल्हा परिषदेकडून ठराव मंजूर झालेला निधी जवळपास 3 महिने मंजूर झालेला असतानाही कब्रस्तान सुरक्षा भिंतीचे काम रखडलेले होते व तिथे कामासाठी टाकण्यात आलेले मटेरियल देखी कमी दर्जाचे निदर्शनास आले मातरळ वाळू, खराब खडी, आणि कॉलम साठी घेतलेले खड्डे देखील नियमांनुसार आराखड्यानुसार कमी मापाचे आढळले असता या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वे केले असता बऱ्याच गोष्टीत हलगर्जीपणा दिसून आला आहॆ.
भीम पँथर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राज खान साहेब यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली कब्रसतानला भेट देऊन मंजूर झालेल्या सर्व कामाचा आराखडा स्वरूप पत्र नुसार पाहणी केली असता हे सगळे खरे आहे असे दिसून आले. या प्रसंगी भीम पँथर सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब शिंदे, जिल्हा महिला युवा अध्यक्षा विजया ताई बारसे, तालुका प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत येवले साहेब, तालुका अध्यक्ष तन्वीर शेख व पदाधिकारी उपस्थित होते.
या कामाची लवकरात लवकर सुरवात करून योग्य त्या पध्दतीने चांगल्या मटेरियल मधी काम सुरू करावा काहीही करणं मुळे अडथळा आणू नये आणल्यास उपोषण करण्यात येईल तसेच आज दिनांक 16/5 रोजी सकाळी 10 वाजता जाफराबाद ग्रामपंचायत चे सरपंच संदीप भाऊसाहेब शेलार यांनी मध्यस्थी करून ठेकेदाराची मातरवाळू कॅन्सल करून खड्डे देखील खोल खंदयला सांगितले तसेच खराब खडी कॅन्सल करून चागल्या पध्छतीची खडी वापरून काम करायला सांगितले व काम लवकरात लवकर मार्गी लावावा असे देखील बजावले.