Disha Shakti

Uncategorized

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरु

Spread the love

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरू,उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्यांसाठी मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

प्रतिनिधी / प्रमोद डफळ: राहुरी विद्यापीठ, दि. 30 मे, 2023 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात आजपासून कांदा बियाण्याची (फुले समर्थ) विक्री पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे व सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. चिदानंद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते पाबळ, जि. पुणे येथील शेतकरी श्री. रामदास चौधरी व श्री. मिनानाथ इंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते कांदा बियाणे देवून विक्री सुरु करण्यात आली आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणुन मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बियाणे विभागाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी कृषि विद्या विभाग प्रमुख तथा प्रमुख बियाणे अधिकारी डॉ. आनंद सोळंके, भाजीपाला पैदासकार डॉ. बी.टी. पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिरसागार, प्रभारी बियाणे अधिकारी डॉ. बी.डी. पाटील, सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे, बियाणे विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी विद्यापीठाचे कांदा बियाणे (फुले समर्थ-18 टन) याबरोबरच मटकी (सरीता), हुलगा (सकस), ज्वारी चारा (फुले गोधन, वसुंधरा), तुर (भीमा), तीळ (फुले पुर्णा, जे.एल.टी-408), सुर्यफुल (फुले भास्कर) इ. बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे डॉ. आनंद सोळंके यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!