Disha Shakti

Uncategorized

श्री संत परमपूज्य धर्मभूषण वटेमोड महाराज प्रणित अखिल भारतीय ग्राम क्रांती महासंघाच्या प्रेरणेने श्री लक्ष्मण गंगाराम यलमोड वतिने कन्यादान

Spread the love

बिलोली प्रतिनिधी – साईनाथ गुडमलवार

बिलोली तालुक्यातील हिंगणी/दर्यापूर येथे श्रीसंत परमपूज्य धर्मभूषण वटेमोड महाराज प्रणित अखिल भारतीय ग्राम क्रांती महासंघाचा प्रेरणेने लक्ष्मण गंगाराम यलमोड स्वतःचा उत्पन्नातून 1/4/2018 पासून सर्व जाती धर्मातील गोरगरीब गरीब होतकरू मुलींच्या विवाहासाठी 5000 रू. रोख रक्कम व भेटवस्तु देऊन कन्यादान करतात याबाबत कुठेच वाच्यता करत नाहीत, किंवा कोणाकडून देणगी,आर्थिक मागणी देखील करत नाहीत अतिशय निस्वार्थ पणे अविरत स्वखर्चाने कन्यादान करत राहतात हिंगणी गाव स्वच्छ असावे हया उदांत्त हेतुने गावामधे इतरत्र कचरा टाकू नका त्यामुळे दुर्गंध पसरते आणि आपले आरोग्य धोकात येईल असे गामस्थाना वेळोवेळी सुचित करतात तसेच स्वखर्चाने घंटागाडी च्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी पडलेला केर,कचरा एकत्र करू गावाचा बाहेर योग्य ठिकाणी टाकले जाते.

सर्व ग्रामस्थ यलमोड चा घंटागाडी चा लाभ घेत आहेत. आर्थिक परिस्थिती हालाकीची असून सामाजिक कार्य करण्याचे विचार मनात असणे देखील यासाठी खूप मोठेपणा लागतो किराणा दुकान व हॉटेल च्या माध्यमातून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात तो स्वतः निर्व्यसनी असून गावातील युवकांना व्यसन करू देत नाही. असा सामाजिक कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये असेल तर गावाचा विकास नक्कीच होईल यात काही शंका नाही. वरील सर्व माहिती मा.जि.प.सदस्य मा.लक्ष्मण लक्ष्मण ठक्करवाड साहेब यांना कळताच हिंगणी येथे शिवांश खत दुकान उद्घाटन प्रसंगी जाऊन लक्ष्मण यलमोड यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन यथोचित सन्मान केला व भरभरून कौतुक केले या सेवा कार्यामध्ये काही मदत लागत असल्यास मी सदैव मदतीसाठी तयार आहे असे आश्वासन ठक्करवाड साहेबांनी दिले त्यावेळी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!