धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसाचे वाटप करण्यात आले.
तेर ता धाराशिव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी दिनांक २६ ते ३० मे या कालावधीत चित्रकला रांगोळी वकृत्व मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या स्पर्धेतील चित्रकला स्पर्धेतील ऋतूजा नाईकवाडी , प्राची कोकरे , सिध्दी मदने , दिव्या आगलावे , रांगोळी स्पर्धेतील राजनंदनी पांढरे , नम्रता मेटे , दिव्या आगलावे , आर्या कुलकर्णी , वकृत्व स्पर्धेतील प्राची कोकरे , श्रावणी झिंजे , संबोधी वाघमारे , प्रिती कोकरे , शिवाजी कोकरे , मॅरेथॉन स्पर्धेतील मुलांमध्ये अर्जून नारे, विशाल कदम , अविनाश इंगळे, महेश सलगर मुलींमध्ये पल्लवी माने अक्षरा अष्टेकर , गौरवी गायके , श्रावणी शेळके , ईश्वरी कानाडे , वेदिका कानाडे , संस्कृती कानाडे , ईश्वरी चिवटे आदि विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर एमटीएस शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरोबा पाडुळे , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पडूळकर, उपाध्यक्ष रमाकांत लकडे, सचिन देवकते , हरी भक्ते, शिवाजी पडूळकर , सोमनाथ धायगुडे ,
आदिंसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply