Disha Shakti

Uncategorized

राहुरीत नेत्र व दंत तपासणी शिबिर संपन्न

Spread the love

दिशा शक्ती न्युज : प्रमोद डफळ, राहुरी – आनंदऋषीजी नेत्रालय अ.नगर व राम रामेश्वर फाउंडेशन राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना तसेच दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या सयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व दंत तपासणी अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . कार्यक्रमाचे उद्घाटन सुभाष कोकाटे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले ह. भ.प. नानासाहेब महाराज शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाँ.चंद्रकांत गिरगुणे यांनी केले.

यामध्ये त्यांनी सांगितले आजपर्यंत 4701रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येणार आहे आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे सर यांनी आपले अवयव डोळे,कान, दात,किती महत्त्वाचे असतात याची माहिती सांगितली . संजय इघे सर यांनी ही मनोगत व्यक्त केले डाँ सचिन शेलार यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया कशी करतात त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल सर्व माहिती सांगितली व डॉक्टर महेश इघे ,सेवानिवृत्त पी आय श्री एम एम पाचारणे साहेब जिल्हा सल्लागार,सलीमभाई शेख राहुरी खुर्दचे उपसरपंच तुकाराम बाचकर प्रमुख उपस्थित होते. प्रहार दिव्यांग मानोरी शाखाध्यक्ष श्री सुभाष कोकाटे सर यांच्या वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देऊन दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या उपक्रमासाठी पाच हजार रुपयांची देणगी देण्यात आली.

तसेच दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत राहुरी शहर महिला शहराध्यक्षा अनामिका हारेल यांच्यावतीने अकरावीच्या पुस्तकाचा संच प्रहार सैनिक संदीप बोरसे यांच्या मुलीसाठी देण्यात आला संघटनेचे जिल्हा समन्वयक श्री.आप्पासाहेब ढोकणे यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित सर्व मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष ,विठ्ठल पांडे, संपर्कप्रमुख रविंद्र भुजाडी, सचिव दत्ताञय खेमनर, तालुका संघटक भास्कर दरंदले अनामिका हरेल, संजय पिल्ले भागवत साळूंके प्रतीक धिमते सुकदेव कीर्तने ,संतोष सरोदे नानासाहेब वाघ इ.सर्व राहुरी पदाधिकारी तसेच राहुरी तालुका शाखा पदाधिकारी उपस्थित होते.सर्व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका संपर्क प्रमुख श्री.रविंद्र भुजाडी यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!