राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरवशे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव ब्राम्हणीत सोमवारी ५ जून रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला. आकर्षक अशा सजवलेल्या रथातून अहिल्यादेवी यांच्या अर्धाकृती पुतळ्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली. प्रांजल सचिन उदे या मुलीने अहिल्यादेवीची वेशभूषा केली. घोड्यावर बसलेल्या अहिल्यादेवीने सर्वांची लक्ष वेधले. मिरवणूकनंतर ब्राह्मणी बस स्टँडवरील वीरभद्र मंदिरासमोर अभिवादन कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाच प्रास्ताविक चांगदेव भिसे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन दादासाहेब हापसे होते. याप्रसंगी अण्णासाहेब बाचकर, नानासाहेब जुंधारे, विलास शिंदोरे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बानकर, शिवाजी राजदेव, विजय बानकर,महेंद्र तांबे,डॉ.काका राजदेव, जालिंदर घुगरे, पत्रकार ज्ञानेश्वर सुरशे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले.चांगदेव भिसे,महेश कोंडाजी वाकडे, जालिंदर वाकडे,जयराम घुगरे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Leave a reply