पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण बेलवंडी फाटा शिवारातील धक्कादायक घटना सोमवारी घडली. अवकाळी वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विज खंडित झालेली होती. यावेळी गावकऱ्यांचा फोन आल्यानंतर वीज महामंडळाने वायरमन वीज दुरुस्तीसाठी वायरमन पाठवला. दम्यान विज दुरुस्ती करत असतांना वायरमन भरत कोल्हे यांचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू झाला. यावेळी कोल्हे यांचा मृतदेह अर्धातास खांबावर लटकून होता.
याबाबत स्थानिक नागरिक व पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, वाडेगव्हाण शिवारातील शेळके यांच्या शेतातील विज पोलावर महावितरणचे वायरमन भरत कोल्हे काम करत असतांना अचानक विज पुरवठा सुरू झाला. त्यामुळे कोल्हे यांना जोराचा विजेचा झटका झटका बसला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावेळी सुमारे अर्धातास त्यांचा मृतदेह विजेच्या खांबावर लटून होता. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले होते.
Leave a reply