संगमनेर प्रतिनिधी / शेख युनूस : संगमनेर तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील असंख्य गावातील नागरिक व शहरातील व्यापारी आणि सकल हिंदू बांधवानी, महिलांनी हिंदू समाजाच्या वतीने प्रचंड भगव्या मोर्चाचे आयोजन केले होते. समस्त हिंदू समाजातील नागरिक महिला यांनी जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय, अशा अनेक घोषणा देत संगमनेर प्रांत कार्यालयावर काढत संपूर्ण संगमनेर व आकोला तालुक्यातील गावे बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला.
या मोर्चाला संबोधित करताना कट्टर हिंदुवादी सुदर्शन चॅनेलचे संपादक पत्रकार सुरेश चव्हाण के यांनी जोरदार भाषणाद्वारे हिंदू बांधवाना आणि भगिनींना जागरूक राहण्याचे आव्हान केले. सकल हिंदू बांधवानी एकत्र येण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.
दरम्यान संगमनेर नगरपालिकेजवळील लालबहादूर शास्त्री चौकातून सकाळी नऊ वाजता हिंदू समाजाचा मोर्चा सुरु करत डोक्यात भगवी टोपी, हातात भगवा झेंडा, गळ्यात भगवी शाल असा वेश धारण हिंदू बांधवानी व असंख्य भगिनींनी मोर्चात सहभाग नोंदवला.
संगमनेर तालुक्यात एका तासात संपूर्ण भगवे झाले. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातून तसेच शहरातून लाखोंच्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मेन रोड चावडी चौक, अशोक चौक,साई बाबा चौक,शिवाजी पुतळा आणि बस स्थानक मार्ग मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला या ठिकाणी सुरेश चव्हाण के आणि शिवाजी गायकवाड यांची भाषणे झाली अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा भव्य मोर्चा काढण्यात आला.
शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये या साठी शहर पोलीस यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. श्रीरामपूर चे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डी.वाय.एस.पि. सोमनाथ वाघचौरे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Leave a reply