जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : नायगाव बाजार तहसील कार्यालय येथे नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मंजुषाताई भगत यांचे तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नायगाव शहर व नायगाव तालुक्यातील विविध जनहितार्थ विषयावरती चर्चा करण्यात आली आहे तालुक्यातील शेतकरी कामगार मजदूर बांधवांना शंभर टक्के न्याय देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन या सखोल बैठकीच्या अनुषंगाने तहसीलदार मॅडम यांनी आश्वासन दिले आहे.
यावेळी उपस्थित जेष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व नेते गजानन शंकरराव पा. चव्हाण, कांडाळाचे माजी सरपंच मारोती कांबळे वंचित बहुजन आघाडी चे युवा जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे शिवसेना शहरप्रमुख नायगाव गजानन रामराव पाटील तमलुरे, सहाय्यक निबंधक कार्यालय नायगावचे सुनील गनलेवार साहेब सुभाष अण्णा नरतावार शिवाजी विभुते सह मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते
Leave a reply