नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : लोक कल्याणकारी राज्यांच्या संकल्पनेत ज्यांच्यासाठी योजना आखल्या जातात त्या योजना बाबतची माहिती साक्षरता लाभार्थ्यांना देणे अत्यावश्यक असते त्या दृष्टीने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे यासाठी केले जाणारे कागदावरची नियोजन आता जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी प्रत्यक्षात उतरून योजना बाबतचा आत्मविश्वास लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यास कृतीबद्ध व्हा, असे आव्हान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या प्रस्तावित भव्य कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन सभागृहात झालेले या बैठकीस जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे,मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे ,मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, जि.पी.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.संजय तूबाकले सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या विकासाची संकल्पना राबवताना अप्रत्यक्षपणे योजनेला मृत स्वरूप हे सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे लाभधारक देत असतात .त्यांच्या मनातील विश्वास वाढवा, शासकीय योजनांचे प्रतिबिंब त्यांच्या विकासात उमटावे, योजनांच्या उद्दिष्टप्रति त्यांच्या मनात सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने शासन आपल्या दारी हे अभियान महत्त्वाचे आहे. यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील यांनी उपक्रमाबाबत व नियोजनाबाबत अमूल्य सूचना केल्या.
Leave a reply