Disha Shakti

इतरराजकीय

उद्धव ठाकरेंना झेड ऐवजी वाय सुरक्षा! संपूर्ण ठाकरे कुटुंबियांची व मातोश्रीची सुरक्षा केली कमी

Spread the love

प्रतिनिधी / रमेश खेमनरराज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात केल्याचा प्रकार समोर आळा आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांची सुरक्षा कमी खरण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन देखील केल्या कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत संपूर्ण ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. या आगोदर उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस आणि आदित्य ठाकरे यांनी वाय प्लस सुरक्षा होती. फक्त कुटुंबियांचीच नव्हे तर मातोश्रीच्या जवळपासच्या परिसरातील देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलिस तैनात असतात मात्र आता ती सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षा कमी केल्यानंतर आता हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

अचानक सुरक्षेत कपात का?गृह विभागाकडून अद्याप या सुरक्षेतील कपातीमागील कारण सांगण्यात आलं नाहीये. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दौरे करत असताना त्यांच्या ताफ्यात काही गाड्या असतात त्यामधील एक एस्कॉर्ट वाहन देखील कमी करण्यात आलं आहे. मात्र याकपातीमागचं कारण अद्याप गृहविभागाकडून सांगण्यात आलेलं नाहीये.आम्हाला याच काही आश्चर्य वाटत नाहीये, सूडबुद्धीचं राजकारण करण्यामध्ये शिंदे फडवीस सरकार क्रयशक्ती खर्च करत आहेत. ही कृती सरकारकडून अपेक्षित कृती आहे.

एका सन्मानिय पक्षप्रमुखाची सुरक्षा अशी कमी करणं एका अर्थाने मुख्यमंत्री आपला लैकिक कमी करुन घेत आहेत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. आमचे पक्षप्रमुखांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून तयार असेल असेही त्यांनी म्हटलं आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!