दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : केंद्रीय विधी व न्याय विभागामार्फत भारत देशात तसेच महाराष्ट्र राज्यात अनुभवी वकिलांची नोटरी पब्लिक नियुक्ती यादी नुकतीच जाहीर करण्यात आली, यामध्ये पुणे जिल्ह्यातील नामांकित फौजदारी वकील आणि गाव मौजे कासुर्डी ता. दौंड, जि. पुणे येथील रहिवासी ॲड.आर. के. भिसे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक व गरजु नागरिकांना तात्काळ कायदेशीर सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.;सदरील नियुक्ती दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील एकमेव पहिली नोटरी पब्लिक नियुक्ती आहे. त्यांचे नियुक्तीने त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Leave a reply