राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा गोटुंबे आखाडा येथील शाळेत आषाढी एकादशीच्या औचित्य साधून भव्य बालदिंडी सोहळ्याचे आयोजन दि.28 जून रोजी करण्यात आले होते. या बाल दिंडी सोहळ्यात शाळेतील लहान मोठ्या सर्व बालकांनी वारकऱ्यांची तसेच विट्ठल रखुमाईसह वेगवेगळी वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी शिक्षिकांसमवेत गोटूंबे आखाडा गावातून भव्य पायी दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठू माऊलीच्या नामघोषाचा गजर करून बालदिंडीचा आनंद लुटला तसेच रिंगणात बाल वारकऱ्यांनी ग्यानबा तुकाराम असा जयघोष करून फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. मुलांच्या या आनंदात ग्रामस्थ पुरुष व महिला वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या बाल दिंडी सोहळ्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व महीला शिक्षिकांसह अंगणवाडी सेविकांनी बालदिंडी सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी अनमोल परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमासाठी राहुरी खुर्द ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.तुकाराम बाचकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पवार आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब दाभाडे व सदस्य अशोक पवार यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रम पार पडल्यानंतर खाऊचे वाटप करण्यात आले.
Leave a reply