Disha Shakti

इतर

मूल होत नाही म्हणून पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं, पतीला पोलिसांकडून अटक

Spread the love

प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : मूल होत नसल्याने पतीचे पत्नीला जाळून मारल्याची घटना नुकतीच महाराष्ट्रात घडली. यातील आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे.कारमध्ये जळून पतीसमोर पत्नीचा‎ मृत्यू झाल्याची घटना नुकतीच तळणी-मंठा रोडवर ‎घडली होती. पतीने दिलेली माहिती व ‎घटना पहिल्यापासूनच संशयास्पद‎ होती. दरम्यान, मृत विवाहितेच्या‎ भावाने दिलेल्या फिर्यादीवरून‎ पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. सविता सोळंके (३०) असे मृत विवाहितेचे तर अमोल ‎सोळंके (काऱ्हाळा, ता. परतूर) असे ‎आरोपी पतीचे नाव आहे.

तेरा वर्षांपासून मूलबाळ होत‎ नसल्याच्या कारणावरून अमोल वेळोवेळी घटस्फोट दे, असे म्हणून‎ पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत होता. तिला शारीरिक‎ व मानसिक त्रास देत होता. अनेकदा‎ त्याने पत्नीकडे घटस्फोट‎ देण्याची मागणी केली. परंतु पत्नी‎ घटस्फोट देण्यास नकार देत‎ असल्याचा राग मनात धरून त्याने पत्नीला‎ कारमध्ये जिवंत जाळून पुरावा नष्ट‎ करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मृत‎ विवाहितेचा भाऊ बळीराम जाधव‎ (स्वामी विवेकानंद नगर, माजलगाव,‎ जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून‎ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे.

दोघे पती-पत्नी रात्री बारा‎ वाजेच्या सुमारासच शेगाव येथून का‎ निघाले, टेम्पोने कारला धडक दिली,‎ तर कार डॅमेज का झाली नाही, कार‎ जळत असताना पतीने काचा फोडून‎ पत्नीला का वाचविले नाही, असे‎ अनेक प्रश्न या घटनेतून उपस्थित होत‎ होते. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर‎ यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित‎ आरोपीस पोलिस उपनिरीक्षक बलभीम‎ राऊत यांनी आरोपीस परतूर‎ तालुक्यातून ताब्यात घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!