अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील राहूरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टी स्टेट संस्थेकडून शिवनेरी क्लब येथे खेळणाऱ्या खेळाडूंना हॉलि्बॉल प्रदान करण्यात आले. सविस्तर माहिती अशी की, साई आदर्श मल्टी स्टेटच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून नेहमी मैदानी खेळाडूंच्या मागे खंभीरपणे उभे असल्याचे मत साई आदर्श संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी व्यक्त केले.
भारत देशाचे भविष्य असणाऱ्या खेळाडूंना शाबासकीची थाप दिल्यास ते आपल्या परिसराचा, गावाचा नवलोकिक जिल्हा, राज्य आणि देशाच्या पातळीवर पोहोचवतात त्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात फिरवत त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिवाजीराव कपाळे साहेब यांनी केले.
यावेळी शिवाजीराव कपाळे म्हणाले की, आपण आपल्या साई आदर्श मल्टी स्टेट संस्थेच्या माध्यमातून नेहमी सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला आहे. रुग्णांना, विध्यार्थ्यांना आणि खेळाडूंना आर्थिक मदत नेहमी करत आलो आहोत आणि या पुढेही राहील. आपल्या सामाजिक कार्याचा वसा हा कोणताही भेदभाव न करता करता सुरु आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवता असून जिद्द, चिकाटी आहे त्या ना पुढे आणण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांना पाहिजे ते क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे जरुरीचे असे मत साई आदर्श मल्टी स्टेट चे संस्थपाक अध्यक्ष माननीय शिवाजीराव कपाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल विद्या शेळके हिचा शिवाजीराव कपाळे यांनी जाहीर सत्कार करत अभिनंदन व्यक्त केले. या कार्यक्रमास साई आदर्श मल्टी स्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी संस्थाचे चेअरमन विष्णुपंथ गीते, व्हा चेअरमन आबासाहेब वाळुंज, दत्तात्रय कडू, किशोर थोरात, बाळासाहेब तांबे, चांगदेव पवळे, प्रशिक्षक राजेंद्र पुजारी सह खेळाडू उपस्थित होते.
Leave a reply