प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे २०२२-२३ वर्षामध्ये अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन वंचित राहिलेल्या सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे असे निवेदन श्रीरामपूर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की राज्य सरकारने आदेश देवुन महसूल अधिकाऱ्यांना सांगितले आहे की सर्व शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावे असे असताना देखील श्रीरामपूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन आपले महसुलचे सर्कल अधिकारी, तलाठी हे व्यवस्थित रित्या पंचनामा करुन आपल्याकडे व शासनाकडे शेतकर्यांचे नाव,गाव, पत्ता बँकेचे अकौंट नंबर, पासबुक झेरॉक्स व्यवस्थित न दिल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले.
तसेच अनेक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतजमीनीचे सर्कल व तलाठ्याने पंचनामे न करता शेतकर्यांकडूनच फोटो व माहिती मागून घेऊन अर्धवट माहिती आपल्या महसुल अधिकार्यांनी शासनाकडे पाठविले. आपल्या महसुल अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळेच अनेक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक शेतकर्यांनी आमच्याकडे तक्रार केले आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन सर्व शेतकर्यांशी संवाद साधून खरच महसुल अधिकारी शेतकर्यांच्या बांधवर जाऊन पंचनामा केला की नाही याची शाहनिशा करुन दोषी आढळणार्या अधिकार्यांवर कामात कर्तव्य कसुर केल्याबद्दल त्यांना बडतर्फ करुन त्यांचे विरुद्ध कठोर कायदेशीर शासन करुन गुन्हे दाखल करण्यात यावे.
जेणे करुन यापुढे कामात हलगर्जी पणा होणार नाही व आपला अन्नदाता शेतकर्यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशी काळजी यापुढे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आपण आदेश द्यावे . आमच्या निवेदनाची दखल घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकर्यांना त्वरीत अनुदान (मदत) देण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आंदोलन प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास श्रीरामपूर येथील महसूल अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले.
याप्रसंगी उपस्थित श्री बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष,श्री विलास पाटणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष, श्री गणेश दिवसे मनसे तालुकाध्यक्ष, श्री सतिश कुदळे मनसे शहराध्यक्ष, श्री संतोष धुमाळ प्रसिद्धीप्रमुख, डॉ. संजय नवथर, भास्कर सरोदे,नितीन जाधव, ऋषभ बर्वे प्रसाद परे, अमोल साबणे, संदीप विशमबर सुरेश शिंदे, दीपक सोनवणे, राजू जगताप, सुरेश शिंदे, विकी परदेसी, नितीन खरे, मारुती शिंदे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
HomeUncategorizedश्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्यांना त्वरीत अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्यांना त्वरीत अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे

0Share
Leave a reply