Disha Shakti

Uncategorized

संत कवी महीपती महाराज यांच्या व पांडुरंगाच्या भेटीला ताहाराबाद येथे लाखो भक्तांची गर्दी

Spread the love

शेख युनूस / अ. नगर : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या ताहाराबाद येथे लाखो भाविकांची गर्दी, संत महीपती महाराज व पांडुरंग भेटीला रंगला सोहळा ताहाराबाद येथील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले संत महीपती हे प्रतिपंढरी असे ओळख असलेले संत महीपती महाराज लाखो भाविकांनी पांडुरंग भेटीला अंतिम भेटीला भाविकांचा जनसागर उसळ ला. मोठ्या भक्ती भावाने वारकरी सालाबादप्रमाणे काल्याचे कीर्तन आणि दहीहंडीचा नयनरम्य सोहळा प्रस्थान होत आहे.

चार दिवसापासून सुरु असलेल्या ताहाराबाद येथील संत महीपती महाराज व पांडुरंग महोत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सुमारे 400 ते 500 पायी दिंडी सोहळ्यांनी सहभाग नोंदवला. चार ते पाच दिवसात राज्यातील पाच लाखाहुन अधिक भक्त भाविकांनी ताहाराबाद येथील प्रतिपंढरी त हजेरी लावली.द्वादशीच्या पर्वनीत विविध पडावर भजन, भारूड, कीर्तन व रात्री जागर आदिसह कार्यक्रम संपन्न करण्यात आले.

यावेळी महिला भगिनी यांनी गवळणी, पाळणे, फुगडी आदी कार्यक्रम करत आनंद द्विगुणित केला. स्वर्गीय सुख सोहळ्याचा सरत्या आषाढ संरीनाही मोह झाला.आषाढ सरीची बरसात सुरु असतानाच भावभक्तीच्या धारामध्ये भक्त वारकरी ओलेचिंब होऊन गेले होते.

कीर्तन कार संत महीपती महाराजांची महंती सांगून भाविकांना मंत्र मुग्ध केले.राहूरी तालुक्यातील कीर्तनकार हे संत महीपती महाराजांचा प्रचार व प्रसार करतात. काळ्यासाठी लाखो दिड्याचे आगमन झाले. रथ, अशव, पालख्या आणि खांद्यावर भगव्या पथकाधारण केलेले वारकरी व टाळ मृदूंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम जयघोष यांनी ताहाराबाद प्रतिपंढरी दानानुन गेली.

284 संतांचे चरित्र ज्या पावन भूमीत लिहिले गेले ती संत कवी महीपती महाराज यांची कर्मभूमी आणि भक्ती विजय ग्रंथाची जन्मभूमी गेली चार दिवसापासून धन्य झाली आहे. संत कवी महीपती महाराजांच्या पावनभूमीत आज काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा लाही घेऊन भक्त वारकरी परतीच्या प्रवासाला लागतो.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!