Disha Shakti

Uncategorized

मधुकर घाडगे यांना राष्ट्रीय समाज भुषण-२०२३ पुरस्कार जाहीर

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / प्रमोद डफळ (राहुरी):बहुजन ग्रामविकास सेवा (असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय समाज भुषण- २०२३ पुरस्कारासाठी राहुरी येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष मधूकर घाडगे यांची निवड करण्यात आली. त्या बाबत मधूकर घाडगे यांना पत्र देऊन पुरस्कारासाठी हजर राहण्यास सांगीतले.

बहुजन ग्रामविकास सेवा (असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संघटने मार्फत “राष्ट्रीय समाज भुषण २०२३ साठी राहुरी येथील मधुकर घाडगे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे सोमवार दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वा. मा. मंत्री महोदय यांच्या हस्ते मधुकर घाडगे यांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

प्रहार दिव्यांग संघटनेचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांना जाहीर झालेल्या पुरस्कारा बाबत राहुरी शहरातील यारी ग्रुपचे सोन्याबापू जगधने, राजेंद्र बोरकर, आदिक खैरे, महेश गुलदगड, पप्पू कोरडे, सुनिल भोसले, नजीर शेख, संदिप शेजूळ, विष्णू गुंजाळ, दिलीप गुंजाळ, महेश पोपळघट, संतोष पटारे, संतोष जगधने, तात्यासाहेब काशीद, संजय सानोरकर, प्रकाश हिवाळे, मनोज साळवे आदिंनी मधुकर घाडगे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच तालूक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मधुकर घाडगे यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!