Disha Shakti

Uncategorized

कुरण रोड येथील झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात वेगळं वळण समोर

Spread the love

      शेख. युनूस अहमदनगर*/….

       दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी संगमनेर मध्ये दोन गटात हाणामारीची घटना सायंकाळी सात वाजता घडली होती.

       संगमनेर मध्ये असणाऱ्या कुरण रोड वरती मच्छी सर्कल या ठिकाणी जमिनीच्या वादावरून दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक होत त्याचे रूपांतर हाणामारीत झाले होते संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहे.

        मात्र हे प्रकरण वरवर जरी वेगळे वाटत असले तरी अंतर्गत मात्र वेगळीच माहिती या प्रकरणाबाबत मिळत आहे.

         फिर्यादी शरीफ रशीद पठाण, व्यवसाय वकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर मधीलच एकूण सात जणांच्या विरोधात विविध कलमानुसार संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यातील एक इसम ज्याच्या वरती विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. ते अश्फाक इब्राहिम पटेल राहणार साकुर. हा इसम मात्र जेव्हा गुन्हा घडला त्यावेळेस त्या ठिकाणी हजर नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झालेली आहे.

       या घडलेल्या घटनेचा घटनाक्रम पाहता अशपाक इब्राहिम पटेल राहणार साकुर. हे त्या ठिकाणी हजर नसल्याबाबतचे तांत्रिक पुरावे मीडियाला प्राप्त झाले आहे.

        15 डिसेंबर सकाळी अकरा वाजता य अशपाक इब्राहिम पटेल राहणार साकुर. हे घारगाव या ठिकाणी त्यांचा मावसभाऊ यांच्या हॉटेल वरती असल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता संगमनेर मधील आनंद वॉच या ठिकाणी

   असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.

      जेव्हा दोन्ही गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले तेव्हा मात्र अश्फाक इब्राहिम पटेल संध्याकाळी सहा वाजून 48 मिनिटांनी हिवरगाव पावसात टोल नाका या ठिकाणावरून स्वतःच्या वाहनातून साकुरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळत आहे.

     सर्व तांत्रिक व्हिडिओ तसेच सीसीटीव्ही फुटेज यांची पाहणी केली असता अशपाक इब्राहिम पटेल राहणार साकुर. हे मात्र जेव्हा गुन्हा घडला तेव्हा त्या ठिकाणी हजर नसताना देखील फिर्याद्याने मुद्दामहून स्वतःच्या वकिली व्यवसायाचा गैर फायदा उचलत पोलिसांची दिशाभूल करत जाणून-बुजून कटकारस्थान रचत अश्फाक इब्राहिम पटेल याचे नाव सदर गुन्ह्यांमध्ये टाकल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.

      याबाबती तील सर्व तांत्रिक पुरावे लवकरच पोलिसांना देणार असल्याचे अशफाक यांनी सांगितले असून नाव सदर गुन्ह्यामध्ये कटकारस्थान रचून घेण्यात आल्याचे तपासी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती देणार आहे.

      सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर शहर पोलीस कशा पद्धतीने करतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

 

       या घटनेची दुसरी बाजू अशी की अश्फाक इब्राहिम पटेल राहणार साकुर हे साकुर तसेच संगमनेर मध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असून जमीन खरेदी विक्री मध्ये साजेशा नावलौकिक अशपाक इब्राहिम पटेल यांना प्राप्त झालेला आहे.

       याच नाव लौकिकाला बाधा पोहोचावी म्हणून मागील तीन ते चार महिन्याच्या कालखंडापूर्वीच

       शरीफ रशीद पठाण व्यवसाय वकील याने अश्फाक इब्राहिम पटेल यांच्या वरती संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये साठ हजार रुपये चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

        सदर प्रकरणांमध्ये बांधकाम व्यवसायिक अश्फाक इब्राहिम पटेल यांचा व्यक्तिगत कुठलाही संबंध नसताना केवळ.

     शेख कुटुंबीय संगमनेर तसेच सादिक रज्जाक शेख राहणार संगमनेर यांचे जावई असल्याकारणाने *कायद्याचा दुरुपयोग करत नाहक त्रास दिला जात आहे.

       अश्फाक इब्राहिम पटेल यांचे मानसिक तसेच आर्थिक खच्चीकरण जर केले तर मात्र सर्व कुटुंब आपल्याला घाबरून राहील अशीच मानसिकता सदर वकिलाने करून घेतली आहे.

        केवळ मानसिक त्रास देणे हाच स्पष्ट उद्देश सदर गुन्ह्यात नाव गोण्या मध्ये असल्याचे निदर्शनास येत आहे.

       सदर प्रकरणाचा निपक्षपातीपणे पोलीस देखील तपास करून आमच्या कुटुंबाला तसेच आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून आणि न्याय व्यवस्थेकडून करण्यात यावी अशी. अपेक्षा अशफाक पटेल यांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!