Disha Shakti

Uncategorized

तेर येथे ग्रामसेवक हजर राहत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामसेवक यांच्या रिकाम्या खुर्चीला हार

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील राजकीय आर्थिक सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तेर गावात ग्राम विकास अधिकारी म्हणून प्रशांत नाईकवाडी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे प्रशांत नाईकवाडी यांची मोहतरवाडी येथील ग्रामसेवक म्हणून नियुक्ती आहे. विशेष बाब म्हणजे माजी खासदार पद्मसिंहजी पाटील व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची तेर ग्रामपंचायत वर 40 वर्षा पासून एकहाती सत्ता आहे व 17 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व २० हजार वीस हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तेर गावास पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसून दीड हजार लोकसंख्या असलेल्या मोहतरवाडी गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक आहे .

तेर येथे अतिरिक्त पदभार असलेले प्रशांत ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी हे सलग अठरा दिवस ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना अडथळा येत आहे त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे तारीख 18 रोजी विरोधी पक्ष्याचे ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब नाईकवाडी,धनंजय आंधळे व सत्ताधारी पक्ष्याचे प्रतीक नाईकवाडी, नवनाथ पसारे ,अजित कदम यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार व पुष्पगुच्छ घालून निषेध व्यक्त केला तसेच शासन आता तरी तेरला पूर्णवेळ ग्राम विकास अधिकारी यांची नियुक्ती करतील का अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे..


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!