जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : दि 23/08/2023 रोजी सायंकाळी सहा वाजता
चांद्रयान तीन भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्न, अचुक अंदाज, आत्मविश्वास, सांघिक प्रयत्न यांचे साकार स्वरुप चांद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पणे उतरवणे या अभिमानास्पद कामगिरी बद्दल प्रशंसासाठी शब्द कमी पडतात.अपयशाने रडणाऱ्या शास्त्रज्ञाना खचू नका मी तुमच्या पाठीशी आहे असा सल्ला देत गळाभेट करून धीर देणारा प्रधानमंत्री, सरकार आणि ISRO चे सर्व वैज्ञानिक व त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे अभिनंदन व चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगातील पहिला देश ठरला चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग झाल्याबद्दल इस्रो च्या सर्व वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन
या मोठ्या आनंद उत्सव नायगाव शहरांमध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने नायगाव शहरांमध्ये फटाके व सर्व भारतीय बांधवांना पेढे भरवत भारत माता की जय वंदे मातरम अशी नारे देत नायगाव शहर डॉ. हेडगेवार चौक या ठिकाणी मोठ्या आनंदाने जल्लोष करण्यात आला.
या आनंदप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते भाऊराव पाटील चव्हाण, अखिल भारतीय धोबी समाजाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष गंगाधरजी माऊली सर, पोलीस पाटील नायगाव तालुका अध्यक्ष भागवत पाटील भुताळे, अशोक पाटील पवार प्रवीण बिरेवार शंकर वडपत्रे गणेश पाटील देगावे संभाजी पोटफोडे किरण पाटील मोरे विठ्ठल बोरीकर शेरो सिंग टाक कैलास वाघमारे संजय गायकवाड कृष्णा चौधरी श्रीनिवास देगावे शिवाजी पाटील चव्हाण गंगाधर गोस्केवार सह नायगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने भारतीय बांधव उपस्थित होते