राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : शेतकऱ्यांना शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांच्या कष्टाला शासकीय योजनांची साथ लाभत आहे. नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमांतून तब्बल १२ लाख १० हजार ७६८ शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देत कृषी विभागाने एक उच्चांक गाठला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
शेतकऱ्यांना अनुदान वितरित
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र आदी अवजारांसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. त्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत चार हजार ८७६ शेतकऱ्यांना ३५ कोटी ८२ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. याशिवाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ४८ कोटी, मागेल त्याला सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ६ हजार ५०५ शेतकऱ्यांना १९ कोटी ९६ लाख, ५५१ शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे आदी याेजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
Leave a reply